पोस्ट्स

कोरोना आणि सामाजिक मानसिकता ....( कोरोना : शारीरिक आजार की अपराध ? )

इमेज
           लोक घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत तर आम्ही घरी जायला.घरी जाऊन आपण कुटुंबाला संसर्गाच्या खाईत तर ढकलणार नाही ना, ही भीती. सध्या कोरोनात एचआर सीटी स्कॅन ला अनन्यसाधारण महत्व आहे. रेडीओलॉजिस्ट डॉक्टर नात्याने कोविड रुग्णांची सीटी स्कॅन करण्यानिमित्ताने दररोज त्यांच्या उपचारात योगदान देण्याचे भाग्य लाभत आहे. डॉक्टरांचा कोरोना रुग्णांशी प्रत्यक्ष संबंध येत असल्याकारणाने संसर्गाचा धोका कैकपटीने वाढतो. कोरोनाने डॉक्टरांच्या मृत्यूची टक्केवारी इतर लोकांच्या तुलनेत जास्त आहे कारण त्यांना संसर्गावेळी मिळणारा व्हायरल लोड जास्त असतो. तरी सगळा धोका पत्करून फक्त डॉक्टर्सच नाही तर इतर कोविड योद्धेही आपल्या कर्तव्यापासून तसूभरही हटलेले नाहीत आणि याची पूर्ण जाणीव असल्याच्या कृतज्ञभावनेचे दर्शन देशवासीयांनी वेळोवेळी दिले आहे. परंतु दररोज रुग्ण व नातेवाईकांच्या संपर्कात राहून काही अनुभव आल्याने कोरोना आणि बदललेली सामाजिक मानसिकता यावर मंथन करणे प्रासंगिक ठरते.              एक गोष्ट ज्यावर प्रसारमाध्यमांनी पुरेशी चर्च...